मानवी शरीर पेशी हा शरीराचा सर्वात लहान भाग आहे. मानवी शरीर लाखो पेशींनी बनलेले आहे. मनुष्याच्या पेशी मिळून एक उती, अनेक वेगवेगळ्या ऊती मिळून एक अवयव बनतो आणि काही अवयव मिळून एक विशिष्ट अवयव प्रणाली तयार करतात. श्वसन प्रणाली,सांगाडा प्रणाली, स्नायू प्रणाली, पचनसंस्था, रक्ताभिसरण प्रणाली आणि उत्सर्जन प्रणाली ह्या आपल्या शरीरातील काही अवयव प्रणाली आहेत.